Ganga Foundation

गंगा केअर सेंटर

“Old Age Home”

आमच्या बद्दल

नमस्कार मित्रांनो मी आदित्य जाधव गंगा फाउंडेशन या एनजीओ चा फाउंडर, याची प्रेरणा मला माझ्या आईकडून व माझ्या बाबांच्या निधनानंतर झाली. काही मेडिकल इमर्जन्सीसमुळे माझे बाबा निधन पावले त्यावेळेस ज्या अडचणी मला आल्या त्याचा विचार मी करत होतो आणि अचानक मला कल्पना आली की जे आपल्या सोबत घडले तेच इतरांसोबतही घडत असेल यासाठी एक कल्पना मनात आली की जे आपल्या सोबत झाले ते कोणत्याही इतर व्यक्तीसोबत होऊ नये यासाठी या एनजीओ ची स्थापना करत माझ्या आई व लहान्या भावास मी विचारून आणखी काही सहकाऱ्यांना याची कल्पना दिली तर त्यांनाही हा विचारा आवडला आणि या विचारातन एक संकल्पनेला व एक विचाराला ज्वलंत करण्यासाठी आम्ही सर्वांनी एक NGO स्थापन केला व त्याच्या माध्यमातून आपल्याला कोणाकोणाला काही सेवा किंवा काही देण्याची इच्छा मनात असताना याची सुरुवात केली.

श्री रामदास लक्ष्मण मोरे
प्रेरणास्थान

गंगा फाउंडेशन ही संकल्पना ज्यावेळेस आम्ही सत्यात उतरवत होतो त्यावेळेस आम्हाला खूप साऱ्या अडचणीला सामोर जाव लागल पण मनामध्ये एक इच्छा व प्रेरणाशक्ती जी बाबांकडून मिळत होती ती कुठेतरी मनात आगीसारखी पेटलेली होती आणि याच्यातूनच आम्ही गंगा फाउंडेशन या एनजीओ ला स्थापित करण्याचा निर्णय घेतला चार-पाच सहकाऱ्यांचे विचार मनात असलेल्या शंका कुशंका सर्व मांडून आम्ही गंगा फाउंडेशन या संकल्पनेला सत्यात आणलं व याच्या माध्यमातून लोकांपर्यंत समाज कल्याण किंवा लोकहित व महिला सशक्तीकरण किंवा पीडित लोकांना मदत करणे तसेच ग्राउंड डेव्हलपमेंट वयोवृद्ध लोकांची सेवा, वृक्षारोपण व पाणपोई या सर्वांना एका कागदावरती भरून आम्ही याचं कार्य चालू केलं.

या कार्याला सुरू करत असताना आम्हाला बरेच डॉक्टर वकील यांनी सपोर्ट केला आणि या सामाजिक कामाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी आमची मदत केली आणि त्या सर्व काम करत असताना  मोठी घटना घडली ज्याच्यात असे आढळून आले की काही जे वृद्ध लोक आहेत यांना जी केअर ची गरज पडते त्या केअर साठी जे चार्जेस केले जातात आज मार्केटमध्ये वीस पंचवीस हजार च्या वरती तर हे पैसे कुठेतरी कमी व्हावे व त्यांना सर्वांना एकाच छताखाली चांगली केअर घेणारी जागा मिळावी यासाठी आम्ही सर्वांनी एक संकल्प केला व विचारविनिमय करत असताना आदित्य जाधव साहेबांच्या मनात एक विचार आला व त्यांनी तो पुढे सर्व सहकाऱ्यांपर्यंत मांडला तो विचार असा होता की आपण एक केअर सेंटर सुरू करावे आणि या केअर सेंटरची माफक दरामध्ये इथे कशी सर्व आजी आजोबा यांची काळजी घेतली जाईल याच्यावरती विचार करून सर्व सहकाऱ्यांपुढे मांडला सर्व सहकाऱ्यांनी हमी भरली व या कार्याला सुरुवात झाली 2015- 2022 सामाजिक काम चालू होते.

2022 एनजीओ आम्ही रजिस्टर केला एनजीओ रजिस्टर करत असताना सर्व प्रकारचे डॉक्युमेंट ची पूर्तता करून आम्ही डॉक्युमेंट गव्हर्मेंट ला म्हणजे धर्मदाय आयुक्तालयात जमा केली. डॉक्युमेंट जमा केल्यानंतर सन 2022 – 2024 जागेसाठी आम्ही तळमळ करत होतो आम्हाला कुठेही रेंट ने जागा मिळाली नाही. पण मनात एक विचार सारखा येत होता की आपण केअर सेंटर चालू करावे पण याच्यासाठी हवा होता पैसा घरची परिस्थिती तशी हालाखीची होती पण प्रेरणास्थान बाबा म्हणजेच रामदास लक्ष्मण मोरे यांचे विचार सारखे डोळे पुढे येत होते लोकांची सदैव मदत करणे त्याच्यामुळे रात्रीची झोपही माझी उडाली होती आणि कष्ट करत करत असताना थोडे थोडे पैसे बाजूला टाकत टाकत आम्ही सामाजिक काम करत होतो तसेच घरासाठी पैसे जमा करत होतो या पैशात ना एक छोटासा रो हाऊस 07-03-2025 घेतला व या ठिकाणी जन्माला आलं गंगा केअर सेंटर…..

गंगा केअर सेंटर चा मेन उद्देश्य वयोवृद्ध लोकांना काळजी करणे त्यांना नर्सिंग स्टाफ प्रोव्हाइड करणे त्यांची मदत करणे आंघोळीला व कपडे घालण्यामध्ये त्यांना जे एकटे करू शकत नाही त्यांना आम्ही मदत करणार व त्यांची काळजी घेतली जाणार अशा प्रकारे हा उपक्रम आम्ही राबवला आणि लोकांनी या केअर सेंटरला चांगली शाबासी देत आमची पाठ थोपवली आणि अभिनंदन म्हणून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डोनेशन साठी संपर्क

सोयी सुविधा

  • 24 तास नर्सिंग स्टाफ उपलब्ध
  • अनुभवी डॉक्टर ची टीम
  • आरोग्य व आहार संबधी मार्गदर्शन
  • चांगल्या आरोग्य साठी रोज योगा व हास्य क्लब
  • 24/7 CCTV कॅमरा
  • नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचारासाठी सुविधा उपलब्ध
  • 24/7 ॲम्बुलन्स सेवा

गंगा केअर सेंटर - लोकेशन मॅप

संचालक मंडळ

श्री आदित्य नारायण जाधव
अध्यक्ष
सौ. श्रुती विजय दुबे
उपाध्यक्ष
सौ. रोहिणी नारायण जाधव
सचिव
श्री अक्षय सतिश चिभडे
सहसचिव
श्री गणेश नारायण जाधव
खजिनदार
श्री मनोज किशोर सूर्यवंशी
सहखजिनदार
सौ. लता रामदास मोरे
सदस्य
डॉ. चंदन कर्नावट
एम. डी. मेडिसीन
डॉ. करिश्मा कर्नावट
एम. डी.
डॉ. गौरी पाटील
आहारतज्ञ
अॅड. आनंद मोरे
कायदेशीर सल्लागार

फोटो गॅलरी

केअर सेंटर

उपक्रम

Testimonials

Post Your Testimonials

    Scroll to Top